मैत्री
मैत्री
जी कधी झाली ते देखील आपल्याला आठवत नाही, ज्यामध्ये डोळे झाकून विश्वास ठेवता येतो. विश्वासघात होण्याची भीती तर मनाला स्पर्श देखिल करत नाही. परिस्थिती कोणतीही असो त्यामधे आपल्याला साथ देणारी ती मोजकी माणसे आपल्यासोबत आहेत या गोष्टीचे समाधान वाटते.
आपण केलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या चुकांनंतरही ते आपले लोक आपल्याला समजून घेतात पैन साथ कधीच सोडत नाहीत. आपल्या गरजेप्रमाणे आपल्या स्वार्थानुसार वागत नाहीत, कठीण परिस्थिती पाहुन पाठ फिरवत नाहीत.
एक वेगळाच विश्वास असतो की, काहीही झाले तरी हे लोक आपल्या सोबत असतील, कोणत्याही सुखात-दुःखात ते आपले वाटेकरी आहेत. सर्वात प्रथम त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो मग ती वेळ दुःख वाटून घेण्याची असो वा सुख द्विगुणित करण्याची.
प्रत्येक छोटा-मोठा सल्ला डोळे झाकून ऐकणे आणि त्यावर विश्वास ठेवणे, मग तो सल्ला कितीही निरुपयोगी असला तरीदेखील.
टिप्पण्या